Wednesday, May 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedराज्य वस्तू व सेवा कर (GST) विभागात लाच..

राज्य वस्तू व सेवा कर (GST) विभागात लाच..

नाशिकमध्ये राज्य वस्तू व सेवा कर (GST) विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ७ मार्च २०२६ रोजी ही कारवाई केली आहे.

प्रकरणातील तपशील खालीलप्रमाणे आहेत:-

राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे (वय ४७) आणि सहाय्यक राज्य कर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे (वय ५५) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी अधिकाऱ्यांची नावे आहेत.

अमित हिरामण जाधव (वय ३६) या खाजगी मध्यस्थ व्यक्तीला २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

तक्रारदाराच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या जीएसटी कारवाईचा तपास लवकर पूर्ण करून देण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती अशी माहिती आहे.

एकूण १.२५ कोटी रुपयांपैकी २० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पाथर्डी फाटा येथील जीएसटी कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

झडती दरम्यान पागे यांच्या कार्यालयातून अतिरिक्त २ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले असून आरोपींचे मोबाईल फोनही ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजते.

राज्यातील अनेक कार्यालयात असेच प्रकार सुरू असल्याची चर्चा असून, एसीबीच्या या मोठ्या कारवाईमुळे नाशिकसह संपूर्ण राज्यातील GST, राज्य कर विभागात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular